Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeक्रीडाविराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा अखेर विवाहबंधनात अडकले

विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा अखेर विवाहबंधनात अडकले

इटली: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा अखेर विवाहबंधनात अडकले. इटलीतील टस्कनी येथे विवाहसोहळा पार पडला. गेल्या आठवड्यापासून विराट- अनुष्काच्या लग्नाची जोरदार चर्चा होती. कोहली आणि शर्मा कुटुंबीय ८ तारखेलाच इटलीसाठी रवाना झालेले. लग्नाला जवळच्याच मित्र- परिवाराला आमंत्रित करण्यात आले आहे.

इटलीत लग्न कुठे होणार, कोणकोणत्या सेलिब्रिटींना आमंत्रित केलं गेलं, मुंबईत रिसेप्शन होणार का, अशा एक ना अनेक गोष्टींची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहे. मात्र, लग्नाबाबत कोणतीही ठोस माहिती अद्याप समोर आली नव्हती. अनुष्का आणि तिच्या कुटुंबीयांना मुंबई विमानतळावरून इटलीसाठी रवाना होताना पाहिलं गेलं, त्यावरूनच अंदाज खरा ठरल्याचं म्हटलं जात होतं. इटलीतल्या टस्कनी इथल्या बोर्गो फिनोखिएतो Borgo Finocchieto या रिसॉर्टमध्ये हा विवाहसोहळा पार पडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments