Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeक्रीडा“मला सिलेक्टर व्हायचे आहे”, अशी इच्छा या क्रिकेटरने केली व्यक्त

“मला सिलेक्टर व्हायचे आहे”, अशी इच्छा या क्रिकेटरने केली व्यक्त

येत्या काही दिवसात भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षण त्याच सोबत अन्य पदांची निवड करण्यात येणार आहे. त्यातच भारताचा माजी खेळाडू व सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यांने थेट निवड समिती प्रमुख होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. वीरु नेहमीच त्याच्या हटके ट्विट्समुळे चर्चेत राहतो. आताही तो अशाच एका ट्विटने चर्चेत आला आहे.“मला सिलेक्टर व्हायचे आहे, पण मला कोण संधी देणार?”, असं ट्विट त्याने  केले. त्यावरून नेटकर्यांची त्याला मजेशीर उत्तरं मिळाली.

सेहवाग ने भारतासाठी 104 कसोटी,  251 वन डे आणि 19 ट्वेंटी-20 सामन्यांत प्रतिनिधित्व केले आहे. कसोटीत त्यानं 49.34 च्या सरासरीनं 8586 धावा केल्या आहेत. 319 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे आणि त्याने एकूण 23 शतकं व 32 अर्धशतकं केली आहेत. वन डेत त्याच्या नावावर 8273 धावा आहेत. त्यात 15 शतकं व 38 अर्धशतकांचा समावेश आहे. 19 ट्वेंटी-20त त्यानं 394 धावा केल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments