Wednesday, April 24, 2024
Homeक्रीडाजागतिक कुस्ती स्पर्धा : भारताच्या राहुल आवारेने पटकावल कांस्य

जागतिक कुस्ती स्पर्धा : भारताच्या राहुल आवारेने पटकावल कांस्य

कझाकस्तान : भारताच्या राहुल आवारे याने जागतिक कुस्ती स्पर्धेत 61 किलो वजन गटात ब्राँझपदकाची कमाई केली. या कामगिरीमुळे जागतिक स्पर्धेत भारताची 1 रौप्य आणि 4 ब्राँझपदक अशी सर्वोत्तम कामगिरी राहिली.

ब्राँझपदकाच्या लढतीत राहुलने अमेरिकेच्या टिलर ग्राफ याचा 11– 4 अशी धूळ चारत त्याचा पराभव केला. लढतीच्या सुरवातीस राहुल 0-2 असा पिछाडीवर पडला होता. मात्र, त्याने पहिल्या फेरीनंतर प्रतिस्पर्ध्यावर 4-2 अशी आघाडी मिळविली होती. या आघाडीनंतर त्याने अमेरिकेच्या प्रतिस्पर्ध्यास लढतीत परतण्याची संधीच दिली नाही.

दुसऱ्या फेरीत राहुल 10-2 अशी आपली आघाडी भक्कम केली. त्या वेळी ग्राफ याने राहुलचा ताबा मिळवून दोन गुण वसूल केले. पण,  त्याला तेवढ्यावरच समाधान मानावे लागले.

भारताची सर्वोत्तम कामगिरी 

यंदाच्या स्पर्धेत मॅटवर उतरणारा राहुल भारताचा अखेरचा स्पर्धक होता. त्याने ब्राँझपदक पटकावून भारताच्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. भारताने या स्पर्धेत 1 रौप्य, 4 ब्राँझ अशी एकूण 5 पदके मिळविली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments