Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeलाईफस्टाइलदिवाळी : घरी कमी वेळात उटणं करा तयार

दिवाळी : घरी कमी वेळात उटणं करा तयार

diwali
दिवाळीच्या दिवसांत दिवाळीची पहिली आंघोळ अत्यंत खास असते. या आंघोळीमध्ये अभ्यंगस्नानाचं विशेष महत्त्व आहे. उटण्याने दिवाळीच्या दिवशी आंघोळ करण्याची प्रथा आहे.

दिवाळी म्हटलं की, खरेदीची लगबग असते. बाजारपेठेत अशा वेळी बनावट वस्तूही विक्रिला येतात त्यामुळे ग्राहाकांची फसवणूक होते. त्यामुळे काही गोष्टी तुम्ही घरी सुध्दा तयार करु शकता. कमी वेळात उटणं तयार करण्याची सोपी पध्दत.

घरगुती उटणं बणवण्यासाठी लागणारं साहित्य. नागरमोथा, मुलतानी माती, गव्हचा कचरा, दारू हळद, आंबे हळद, साधी हळद, चंदनपावडर गुलाबपावडर हे सारे पदार्थ व्यवस्थित एकजीव करून घ्या.

शरीरावर उटणं लावण्याआधी तेल नक्की लावा. उटणं लावण्याचे फायदे देखील बरेचं आहेत.

दिवाळी व्यतिरिक्तही नियमित चेहरा धुण्यासाठी, शरीरावरील मृत पेशींचा थर काढण्यासाठी उटणं फायदेशीर आहे.

चेहर्‍यावरील अनावश्यक केस हटवण्यासाठी, उन्हामुळे काळवंडलेली त्वचा पुन्हा तजेलदार करण्यासाठी उटणं फायदेशीर आहे.

उटण्यामुळे शरीरात रक्ताभिसरणाच्या प्रक्रियेला चालना मिळते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments