Facebook वर Like करता येणार नाही कोणाचंही पेज, कंपनीची घोषणा

नव्या वर्षाच्या सुरूवातीला दिग्गज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने काही मोठे बदल केले आहेत. अलिकडेच फेसबुकने आपल्या इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपच्या पॉलिसीमध्ये बदल केले. त्यानंतर आता कंपनीने फेसबुक पब्लिक पेजमधून ‘Like’ बटण हटवलंय. कंपनीने लोकप्रिय व्यक्तिमत्व, कलाकार, खेळाडू, नेते किंवा अन्य संस्था व ब्रँड्सद्वारे बनवलेल्या पब्लिक पेजला रिडिझाइन केलं असून ‘Like’ बटणला पेजमधून हटवलंय.

पेजमधून ‘Like’ बटण हटवल्याने आता फेसबुक पेजवर केवळ फॉलोअर्स दिसतील, तसेच एक वेगळं न्यूज फीड असेल तिथे युजर्स कन्व्हर्सेशनमध्ये सहभागी होऊ शकतात. फेसबुकवर लाइक आणि फॉलो असे दोन पर्याय मिळतात. पण आता अपडेटनंतर तुम्हाला केवळ फॉलो हाच पर्याय मिळेल. मात्र एखाद्या पोस्टसाठी आधीप्रमाणेच लाइक बटण मिळेल असंही कंपनीने स्पष्ट केलंय.

लाइक बटण हटवल्याने पब्लिक पेजवर कंटेंटची क्वालिटी अजून सुधारेल, फॉलोअर्सना त्यांच्या आवडीच्या पेजसोबत कनेक्ट होण्याची प्रक्रिया सोपी व्हावी हा आमचा हेतू आहे, असं कंपनीने जारी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय. फेसबुकने नव्या अपडेटबाबत एका ब्लॉगद्वारे माहिती दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here