Thursday, March 28, 2024
Homeलाईफस्टाइललॅपटॉपनंतर आता Nokia ने भारतात लाँच केला AC

लॅपटॉपनंतर आता Nokia ने भारतात लाँच केला AC

स्मार्टफोन, टीव्ही आणि लॅपटॉपनंतर आता नोकियाने भारतात एसी (एअर कंडिशनर) लाँच केलाय. नोकियाच्या एअर कंडिशनर्समध्ये इनव्हर्टर टेक्नॉलॉजी आणि मोशन सेन्सर्स यांसारखे फिचर्स आहेत. 30,999 रुपये इतकी एसीची बेसिक किंमत ठेवली आहे.

29 डिसेंबरपासून फ्लिपकार्टच्या वेबसाइटवर नोकियाचे एसी विक्रीसाठी उपलब्ध
29 डिसेंबरपासून फ्लिपकार्टच्या वेबसाइटवर नोकियाचे एसी विक्रीसाठी उपलब्ध असतील. नोकियाने या एसींसाठी ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टसोबत भागीदारी केली आहे. नोकियाच्या एसींचं वैशिष्ट्य म्हणजे हे एअर कंडिशनर्स संपूर्णपणे भारतात डिझाइन करण्यात आले.

मॅन्युफॅक्चरिंगही भारतातच झाली आहे. नोकिया एसीमध्ये सेल्फ क्लिनींग टेक्नॉलॉजीसोबतच फोर-इन-वन अ‍ॅड्जस्टेबल इनव्हर्टर मोड आहे. याशिवाय एनव्हायरमेंट फ्रेंडली R-32 रेफ्रिजेरेन्ट, मोशन सेन्सर आणि वायफाय कनेक्टेड स्मार्ट क्लायमेट कंट्रोल यांसारखे शानदार फिचर्स आहेत.

 फोनद्वारे एसी करता येणार कंट्रोल
तसेच, स्मार्टफोनद्वारेही एसी कंट्रोल करता येईल. नोकियाच्या एअर कंडिशनर अ‍ॅपमध्ये स्मार्ट फिल्टर क्लीन रिमाइंडर, मल्टीपल शेड्यूलर, स्मार्ट डायग्नोसिस यांसारखे फिचर्सही आहेत. तसेच, टर्बो क्रॉस फ्लो फॅनसोबत फोर-वे क्रॉसिंग आणि नो-नॉइजचा पर्यायही मिळेल. एसीमध्ये ट्रिपल इनव्हर्टर टेक्नॉलॉजी आणि Hidden डिस्प्लेही आहे. भारतीय युजर्सच्या गरजा लक्षात घेऊन या एसीची निर्मिती करण्यात आली असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments