Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeलाईफस्टाइल‘तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला’

‘तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला’

Makar Sankranti Haldi Kumkumमकर संक्रांतीमध्ये जानेवारीत देशभरातील सर्व महिला हळदी कुमकुम साजरी करण्यासाठी उत्सुक असतात. मकर संक्रांतीनंतर हा सोहळा साजरा केला जातो. हा उत्सव वर्षाचा पहिला उत्सव आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हा एकमेव उत्सव आहे . आज मंळवार ( १४ जानेवारी ) रोजी भोगी असून उद्या बुधवार ( १५ जानेवारी ) संक्रात आहे. त्याचीच उत्सूकता सगळ्यांना लागलेली आहे.

नात्यातील कटूता विसरुन त्यात माधुर्य पेरण्याची संधी देणारा हिंदू संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण म्हणजे ‘मकर संक्रांत’! ‘तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला’ असे म्हणत लहान थोर सारेच तीळाचे लाडू, तीळाच्या वड्या, गूळपोळी अशा पौष्टिक पदार्थांचा आस्वाद घेतात.

पहिली मकर संक्रांत असणा-या नवविवाहित जोडप्याला गोड हलव्यापासून बनविलेल्या दागिन्यांनी सजवून त्यांचा कौतुक सोहळा पार पडतो. घरातील सुवासिनी समृद्धीचे प्रतीक म्हणून सुगड्यांची मनोभावे पूजा करतात. ‘सुगडे’म्हणजे छोटे मडके, यामध्ये धन धान्य, सोबत उसाचे काप, गाजर, गव्हाच्या ओंब्या, बोरं, तिळगूळ अशा जिन्नसांनी सुगडे भरुन त्याला हळद कुंकू लावून त्यांची पूजा केली जाते. या पूजेनंतर गृहिणी मकर संक्रांतीच्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत आपल्या सवडीप्रमाणे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आखतात व वाण घेण्यासाठी आपल्या मैत्रिणींना आमंत्रित करतात. घरी आलेल्या मैत्रिणींना दिली जाणारी भेटवस्तू म्हणजेच ‘वाण’!

हा दिवस साजरा करण्यासाठी, महिला ‘हळदी कुंकू’ म्हणून एक कार्यक्रम आयोजित करतात, ज्यावेळी ते इतर स्त्रियांना आमंत्रित करतात आणि त्यांच्या कपाळावर हळद (हळदी) आणि सिंदूर (कुमकुम) लावतात, त्यांच्या हातावर डब अत्तर (अत्तर) लावतात, गुलाबपाणी  शिंपडतात आणि त्यांना तीळ गुळ, फूल,  नारळ आणि एक छोटी भेटवस्तू वाण म्हणून देतात.

भारतातील पश्चिम राज्यांत बहुतेक लोकप्रिय, मकर संक्रांतीचा काळ अध्यात्मिक अभ्यासासाठी अनुकूल मानला जातो आणि या काळात दिलेली कोणतीही भेटवस्तू देवीकृपेचा आशीर्वाद मानली जाते.

विशेषतः ह्या काळात काळ्या रंगाचे सुती कपडे घालणं फायद्याचं आहे. कारण काळ्या रंगामध्ये उष्णता शोषून अधिक काळ टिकवण्याची क्षमता असते. त्यामुळे थंडीपासून रक्षण होण्यास मदत होते. महाराष्ट्रात प्रामुख्याने मकर संक्राती दिवशी काळ्या साड्या नेसल्या जातात. प्रामुख्याने नवदांपत्यांसाठी लग्नानंतर पहिल्यांदा येणारा मकर संक्रातीचा सण खास असतो. यादिवशी हलव्याच्या दागिन्यांनी दोघांनाही सजवलं जातं. हलव्यापासून म्हणजेच फुटाण्यापासून मंगळसूत्र, नथ, चिंचपेटी, बांगड्या ते बाजूबंद बनवले जातात. महिला आणि पुरूष मकर संक्रांतीदिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करून हे हलव्याचे दागिने घालतात. घरातील वरिष्ठ मंडळी या दिवशी नवदांपत्यांचे औक्षण करतात.  मकरसंक्रात ही उत्तरायणाच्या काळात येते. यादिवशी सूर्य मकर राशी मध्ये प्रवेश करतो.

गेली वर्षानुवर्षे सुरु असणा-या या परंपरेमागे स्त्रियांचा एकत्र येण्याचा हा एक सामाजिक उद्देश असतो. पुर्वीच्या स्त्री वर्गाची परिस्थिती पाहाता धार्मिक कारण असल्याशिवाय स्त्रियांना घराबाहेर पडण्यास मुभा नव्हती. त्यामुळे सध्या , हळदी कुंकवानिमित्त एकमेकांच्या घरी जाण्याने होणा-या गप्पा गोष्टी यातून वाढणारा सलोखा अधिक उपयुक्त ठरला आहे. सध्या स्त्रिया उत्साहाने मैत्रिणींचा ग्रुप तयार करुन एखादे मंडळ स्थापन करतात आणि या माध्यमातून वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम, सहली, भिशी सारखे गुंतवणूकीचे उपक्रम देखील राबवतात. ज्यामुळे, घराच्या चौकटी सांभाळत स्वविकास करु पाहाणा-या महिलांना समविचारी मैत्रिणी मिळतात; ज्या मिळून घरगुती व्यवसायावर एकत्रितरित्या काम करतात व सोबत विरगुंळाही होतो. ‘गोड गोड बोला’ असे सांगणारी मकर संक्रांत विचारांची देवाण घेवाण करीत आप्तेष्टांशी नात्याचा बंध जपण्याचा महत्त्वाचा संदेश देते व स्त्रियांना धार्मिक कारणाने एकत्र आणणारे ‘हळदी-कुंकू देखील यशस्वी होते!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments