Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeलाईफस्टाइलKartik Purnima : याच दिवशी का साजरी केली जाते 'देवदिवाळी'?

Kartik Purnima : याच दिवशी का साजरी केली जाते ‘देवदिवाळी’?

kartik purnima
कार्तिक मासात येणा-या पौर्णिमेच्या तिथीला ‘त्रिपुरारी पौर्णिमा‘ (Tripurari Purnima) म्हणून संबोधले जाते. असं म्हणतात ही त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे दिवाळी सणाचा उत्तरार्ध असते. या पौर्णिमेला कार्तिक पौर्णिमा असे म्हणतात. याच दिवशी देवदिवाळी (Dev Diwali) हा सण देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिवाळी ही केवळ पाच दिवसाची असून भाऊबीजेला संपते असे सर्वसाधारण मानले जाते. पण दिवाळी ही केवळ 5 दिवसांची नसून हीच दिवाळी कार्तिक पौर्णिमेपर्यंत असते.

कार्तिक पौर्णिमा (Kartik Purnima) का व कशासाठी साजरी करतात ?

कार्तिक मासात येणा-या या त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शंकरांनी त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून देखील ओळखले जाते. त्रिपुरासुराने सामान्य लोकांपासून ते राजे-महाराजे आणि देवांना पळताभुई केल होत. त्यामुळे यज्ञ याग देखील बंद झाले होते. अखेर भगवान शंकरांना भक्तांचे हे दु:ख पाहावले नाही आणि त्यांनी अखेर त्रिपुरासूराचा वध केला. अशा विनाशकारी राक्षसाचे स्मरण लोकांना राहावे, म्हणून देवांनीच या तिथीला त्रिपुरासुराचे नाव दिले. त्यामुळे वाईटाचा नाश करत ज्ञानाचे दिवे प्रज्वलित करत आपण ही त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करतो.

कार्तिक पौर्णिमेला ‘हे’ कार्य केल्यास होईल धनलाभ :

  • कार्तिक पौर्णिमेस भगवान शंकरासह माता पार्वती व कार्तिकेय यांची पूजा अवश्य करावी. हा दिवस कार्तिकेयाचा जन्म दिवस असल्याचे मानण्यात येते.
  • कार्तिक पौर्णिमेस सत्यनारायणाची पूजा करा, असे केल्याने आपल्या घरात सुख, शांत आणि समृद्धी नांदेल.
  • पौर्णिमेच्या दिवशी गरिबास पांढऱ्या वस्त्रासह दूध, मिठाई व तांदूळ यांचे दान करा. त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते.
  • लक्ष्मीसह चंद्रास तांदळाच्या खीरीचा नैवेद्य दाखविल्याने माता लक्ष्मी कृपा आपल्यावर राहण्यास मदत होते.
  • या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करा.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments