Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeलाईफस्टाइलदिवाळी : या सहा गोष्टींमुळे लक्ष्मीची कृपा होते

दिवाळी : या सहा गोष्टींमुळे लक्ष्मीची कृपा होते

diwali lakshmi pooja
दिवाळीत या सहा गोष्टी केल्यामुळे स्थायी लक्ष्मीची कृपा प्राप्त करता येते. स्थायी लक्ष्मी म्हणजे, घरात स्थिर रुपात निवास करणारी लक्ष्मी. ज्या घरात स्थायी लक्ष्मीचा वास असतो त्या घरात धनाची कमतरता नसते. दिवा, प्रसाद, कुंकू, फळे-फूले या गोष्टींमुळे स्थायी लक्ष्मीची कृपा प्राप्त करता येते.

खीर…

शास्त्रांनुसार खीर लक्ष्मीचे प्रिय व्यंजन आहे. दिवाळीच्या पूजेत मिठाई ठेवण्यासोबतच घरी तयार केलेली खीर ठेवली पाहिजे. यामुळे प्रसादाच्या स्वरुपात खीर अवश्य ठेवावी.

तोरण…

दिवाळीच्या दिवशी मुख्य व्दारावर बांधले पाहिजे. आंबा, पिंपळ आणि अशोकच्या नवीन कोमल पानांच्या माळेला तोरण म्हटले जाते. देवी-देवता या पानांच्या सुगंधाने आकर्षित होऊन घरात प्रवेश करता.
पानांच्या प्रभावाने मुख्य व्दाराच्या आजुबाजूला नकारात्मक ऊर्जा सक्रिय होऊ शकत नाही. घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.

ऊस…

महालक्ष्मीचे एक रुप गजलक्ष्मी देखील आहे. या रुपात लक्ष्मी ऐरावत हत्तीवर स्वार दिसते. ऊस ही लक्ष्मीच्या ऐरावत हत्तीची प्रिय खाद्य-सामग्री आहे. दिवाळीच्या दिवशी पूजेत ऊस ठेवल्याने ऐरावत प्रसन्न राहतात.

ऐरावतच्या प्रसन्नतेने लक्ष्मी देखील प्रसन्न हेते. पूजा पुर्ण झाल्यावर प्रसादाच्या रुपात ऊसाचे सेवन केले जाते. पूजेत ऊस ठेवण्याचा भाव म्हणजे ऊस गोड असतो आणि त्याच प्रकारे आपल्या वागण्या-बोलण्यातही गोडवा येतो.

पिवळी कवडी…

लक्ष्मी पूजनाच्या ताटात पिवळ्या कवड्या ठेवण्याची परंपरा पुरातण काळापासुन सुरु आहे. या पिवळ्या कवड्या धन आणि लक्ष्मीचे प्रतीक आहेत. पूजेनंतर या कौड्या तिजोरीत ठेवल्याने लक्ष्मीची कृपा सदैव राहते.

रांगोळी…

लक्ष्मीच्या पूजनाच्या स्थानावर, प्रवेशव्दार आणि अंगनात धार्मिक चिन्ह कमळ, स्वास्तिक, कळस यांची रांगोळी काढावी. मानले जाते की, लक्ष्मी रांगोळी पाहुन लवकर आकर्षित होते. रांगोळीत बनवलेले चिन्ह घरातुन नकारात्मक ऊर्जा दूर करते. रांगोळीच्या प्रभावाने घरात सकारात्मकता आणि पवित्रता वाढते.

पान…

पान देखील दिवाळीच्या पूजेसाठी खुप शुभ मानले जाते. ज्या प्रकारे पान खाल्ल्याने पोटाची शुध्दी होते, पाचन तंत्राला मदत मिळते, त्या प्रकारे पूजेच्या वेळी पान ठेवल्याने घराची शुध्दी होते आणि वातावरण सकारात्मक आणि पवित्र राहते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments