Thursday, April 25, 2024
Homeलाईफस्टाइलदिवाळी : दाराजवळ दिवा लावण्याची काय आहे प्रथा

दिवाळी : दाराजवळ दिवा लावण्याची काय आहे प्रथा

diwali lamp
दिवाळीत दिवे लावण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे. तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावल्याने धार्मिक तसेच आरोग्य लाभही होतात. दिवा लावल्याने नकारात्मकता नष्ट होते. घरातील वातावरण राहते सकारात्मक राहते.

देवी-देवतांसमोर तुपाचा दिवा आपल्या डाव्या बाजूला लावावा आणि तेलाचा दिवा उजव्या हाताकडे लावावा.

तुपाच्या दिव्यासाठी पांढऱ्या रुईच्या वातीचा उपयोग करावा. याउलट तेलाच्या दिव्यासाठी लाल धाग्याच्या वातीचा उपयोग करणे जास्त शुभ राहते.

पूजा पूर्ण होईपर्यंत दिवा विझणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे. दिवा विझल्यास पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही. दिवा चुकून विझल्यास लगेच लावावा आणि देवाकडे क्षमायाचना करावी.

शास्त्रानुसार रोज संध्याकाळी मुख्य दाराजवळ दिवा लावावा. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते. यामुळेच संध्याकाळी मेनगेटजवळ दिवा लावण्याची प्रथा चालत आली आहे.

दिव्याच्या धुराने वातावरणामध्ये उपस्थित हानिकारक सूक्ष किटाणू नष्ट होतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments