अखेर आमदार शिवेंद्रसिंहराजेंसह १०० समर्थकांवर गुन्हा दाखल

- Advertisement -

सातारा : आनेवाडी टोलनाका ताब्यात घेण्याच्या उद्देशाने जमाव व शस्त्रबंदीचा आदेश डावलून येथील शासकीय विश्रामगृहावर बेकायदा जमाव जमवल्याप्रकरणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह त्यांच्या १०० समर्थकांवर शहर पोलिस ठाण्यात आज (गुरूवार) गुन्हा दाखल करण्यात आला.

माजी उपाध्यक्ष जयेंद्र चव्हाण, नगरसेवक अमोल मोहिते (रा. माची पेठ), अतुल चव्हाण, विनोद ऊर्फ बाळू खंदारे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, विक्रम पवार, हरी साळुंखे (गुरुवार पेठ), फिरोज हबीबखान पठाण, बाळासाहेब महामुलकर, अमित महिपाल, रवी पवार (सर्व रा. फॉरेस्ट कॉलनी व गोडोली), माजी नगरसेवक प्रवीण पाटील (रा. सोमवार पेठ), पंकज पवार (रा. कोडोली), आमदारांचे स्वीय सहायक गणेश भोसले, बाळू दणाणे, राहुल सोनावणे, अनिकेत तपासे, सनी शिंदे, अक्षय कांबळे, आकाश नेटके, कैलास मायणे, संग्राम दणाणे, अजिंक्‍य दणाणे, प्रवीण ऊर्फ गोट्या तपासे (सर्व रा. मल्हार पेठ), चेतन सोळंकी, बबलू सोळंकी (रा. सदरबझार), मुक्तार पालकर (गुरुवार परज), अक्षय अजित मोहिते, रवींद्र खरात (दोघे रा. गुरुवार पेठ), अन्सार आतार, योगेश दत्तात्रय शिंदे, मुन्ना सलीम बागवान (सर्व रा. शनिवार पेठ), संतोष कांबळे, योगेश चोरगे (दोघे रा. रविवार पेठ), निशिकांत पिसाळ, दत्ता तोडकर, सागर काळोखे (सर्व रा. करंजे), मयूर बल्लाळ (रा. प्रतापगंज पेठ), नाना इंदलकर (रा. तांदूळआळी) यांच्यासह वाई, पाचगणी, खेड शिवापूर, रहिमतपूर, पुणे येथील अन्य 100 जणांवर हा गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -