अधिकृत फेरीवाल्यांना हटवणं गैर: संजय राऊत

- Advertisement -

महत्वाचे…
१.फेरीवाला प्रकरणात शिवसेनेने घेतली उडी २. शिवसेनेच्या भूमिकेकडे लागले होते सर्वांचे लक्ष ३. भाजपाही अजूनही चूप्पी


नाशिकज्या फेरीवाल्यांना महापालिकेने परवानगी दिली आहे, त्यांना व्यवसाय करण्याचा अधिकार आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं.  मनसे विरुध्द फेरीवाला असा सामना रंगल्यानंतर मौनबाळगले होते. शिवसेनेने या वादात उडी घेतली. शिवसेना अधिकृत फेरीवाल्यांच्या पाठिशी उभी राहणार आहे.

“ज्यांच्याकडे परवाने आहेत, ते अधिकृत आहेत. त्यांना व्यवसाय करण्याचा, जगण्याचा अधिकार आहे. त्यांचं हातावर पोट आहे. ज्यांच्याकडे परवाने आहेत, त्यांच्याविरोधात कोणालाही भूमिका घेणं परवडणारं नाही” असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

फेरीवाल्यांबाबतच्या या भूमिकेमुळे आता शिवसेना आणि मनसे आमने सामने येण्याची शक्यता आहे. कारण राज ठाकरेंनी यापूर्वीच अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीनंतर राज ठाकरेंनी फेरीवाल्यांना हटवण्यासाठी प्रशासनाला १५ दिवसांची मुदत दिली होती. मात्र फेरीवाल्यांना न हटवल्याने मनसेने फेरीवाल्यांना मारहाण करुन हटविले होते. त्यानंतर प्रशासनाने फेरीवाल्यांना हटविले होते. शिवसेनेची भूमिका काय आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केल्याने सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाले.

- Advertisement -