आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत इथिओपिआचा सोल्मन डेक्सिस ठरला विजेता! ‘

- Advertisement -

मुंबई : मुंबईत ११ व्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेला एलिट मॅरेथॉन पूर्ण झाली असून यात इथिओपिआचा धावपटू सोल्मन डेक्सिसने विजेतेपद मिळवले आहे. तर दुसऱ्या स्थानी बहारिनचा धावपटू आणि तिसऱ्या क्रमांकावर केनियाच्या धावपटू राहिला. भारतीय पुरुषांमध्ये गोपी थोनाकल मॅरेथॉन विजेता ठरला आहे. तर, नितेंद्रसिंह रावत भारतीय पुरुषांमध्ये दुसऱ्या स्थानावर राहिला. तसेच इथिओपियाची अमानी गोबेना महिलांच्या मॅरेथॉनमध्ये विजेती ठरली.

रविवारी पहाटे उत्साहात सुरुवात झाली. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी या स्पर्धेला फ्लॅगऑफ दिला. पहाटे ५.४५ वाजता मुख्य मॅरेथॉनला तर ६.१० वाजता ड्रीम रनला सीएसटीहून सुरुवात झाली. दरम्यान, अर्ध मॅरेथॉनवर सेनादलाच्या धावपटूंनी नाव कोरले असून महिलांच्या अर्ध मॅरेथॉनमध्ये नाशिकच्या मुलींनी बाजी मारली आहे. यामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनीही सहभाग घेतला होता.

मुंबई मॅरेथॉनमध्ये सहा प्रकारच्या रनचा समावेश होता. पूर्ण मॅरेथॉन ही ४२.१९५ किमीची असून यामध्ये ६,९५५ धावपटू सहभागी झाले होते. यामध्ये देशविदेशातील धावपटूंनी सहभाग नांदवला होता. हाफ मॅरेथॉन २१.०९७ किमीची असून यात १४,९५० धावपटू सहभागी झाले आहेत. टाइम रन मॅरेथॉन १० किमीची असून यात १, ६५२ स्पर्धक सहभागी झाले होते. ड्रीमरनसाठीचे अंतर हे ६.६ किमीचेचे होते. यामध्ये १८,५०० मुंबईकरांनी सहभाग घेतला होता. सिनिअर सिटिझन रन ४.६ किमीची असून यात १,१३० ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग झाले होते. चॅम्पिअन विथ डिसेब्लीटी रन २.४ किमीची असून यात १,२२० अपंग स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

- Advertisement -

या स्पर्धेसाठी मुंबई महापालिकेने जय्यत तयारी केली होती. या संपूर्ण इव्हेंटसाठी २७ पाणी केंद्रांवर मिळून १.५ लाख लिटर पाणी उपलब्ध करुन देण्यात आले होते. त्याचबरोबर ११ रुग्णवाहिका, १२ वैद्यकीय केंद्र, ५०० डॉक्टर्स, ३४३ प्रसाधन गृह, २ बेस कॅम्प (आझाद मैदान गेट नंबर १ आणि २), ९,००० पोलिस कर्मचारी, १,४०० सुरक्षा रक्षक, ९ रिस्टोरेशन केंद्र, १,४०० स्वयंसेवक, ११ रिफ्रेश झोन, ७२ केमिकल टॉयलेट्स, ११ कुल स्पंज स्टेशन आणि ३३ स्वच्छतागृह आदी सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होते.

एलिट मॅरेथॉन पूर्ण झाली असून यात इथिओपिआचा धावपटू सोल्मन डेक्सिसने विजेतेपद मिळवले आहे. तर दुसऱ्या स्थानी बहारिनचा धावपटू आणि तिसऱ्या क्रमांकावर केनियाच्या धावपटू राहिला. भारतीय पुरुषांमध्ये गोपी थोनाकल मॅरेथॉन विजेता ठरला आहे. तर, नितेंद्रसिंह रावत भारतीय पुरुषांमध्ये दुसऱ्या स्थानावर राहिला. तसेच इथिओपियाची अमानी गोबेना महिलांच्या मॅरेथॉनमध्ये विजेती ठरली.

- Advertisement -