Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्र…आणि दिव्यांग अविनाश बनला गावाचा कारभारी

…आणि दिव्यांग अविनाश बनला गावाचा कारभारी

वाशीमजन्मापासूनच दिव्यांग असलेला अविनाश धामंदे हा गावाचा सरपंच बनला. वाशीम जिल्ह्यातल्या शेंदूरजना मोरे गावातील गावकऱ्यांनी गावाचा सरपंच पदी निवड केली. ही निवड म्हणजे लोकशाहीतला चमत्कार आहे.

लोकशाहीत जनता बळ देते तेव्हा पाय नसलेली माणसंही खंबीरपणे उभी राहतात आणि जनता नाकारते तेव्हा भलेभले अधू होऊन घरी बसतात. आपल्या लोकशाहीचं हेच सामर्थ्य वाशीम जिल्ह्यातल्या शेंदूरजना मोरे गावात पाहायला मिळालंय. जन्मापासूनच्या दिव्यांगामुळे स्वत:च्या पायावर उभा राहू न शकणारा अविनाश धामंदे गावाचा कारभारी बनलाय.

एकदा निवडून गेलेल्या लोकांनी मागे फिरुन पाहिलं नाही म्हणून गावाची व्यवस्था पंगू बनली. याच अस्वस्थतेतून अंथरुणात पडलेला अविनाश धीरोदात्तपणे निवडणुकीच्या रिंगणात उभा राहिला.  गावानं त्याला साथ दिली…पायात बळ दिलं.

जनतेतून सरपंच निवडण्याचा सरकारनं निर्णय घेतल्यावर घराणेशाही, मनी आणि मसलपॉवरच्या जीवावर निवडणुका जिंकल्या जातील अशी भीती व्यक्त होत होती. पण शेंदूरजना मोरे गावच्या मतदारांनी भल्या भल्यांना बाजूला सारत अविनाशला उचलून धरलं आणि चमत्कार घडवला. परिस्थितीपुढे गुढघे टेकणाऱ्या अनेकांच्या पायात अविनाशच्या विजयानं बळ आलं असेल यात शंका नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments