Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. सुधाकर कु-हाडे

उत्तर महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. सुधाकर कु-हाडे

जळगाव : बारीपाडा येथे फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या उत्तर महाराष्ट्र विभागीय पक्षी मित्र संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ पक्षी अभ्यासक आणि संशोधक डॉ. सुधाकर कु-हाडे यांची निवड करण्यात आली आहे. या संमेलनासाठी संचालन समितीही गठीत करण्यात आली आहे.

बारीपाडय़ाचा कायापालट करणारे चैत्राम पवार या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून अभय उजागरे निमंत्रक तर सहनिमंत्रक अनिल महाजन आहेत.
इतर पदाधिकारी या प्रमाणे – समन्वयक – अमन गुजर, संयोजक- राजेंद्र नन्नवरे, सहसंयोजक- इम्रान तडवी, अनिल माळी (नाशिक). संमेलन संचालन समितीमध्ये प्रा. पी. एम, व्यवहारे, राहुल सोनवणे, बाळकृष्ण देवरे, अर्चना उजागरे, आणि विक्रम पाटील यांचा समावेश आहे.

विविध विषयावर चर्चा
नागरी आणि शहरी भागातील पक्षी संवर्धन,  पाणवठय़ावरील पक्षी संवर्धन, वनक्षेत्रातील पक्षी संवर्धन, पक्षी अधिवास संकट,  पक्षी अभियान चळवळ आणि संस्था बांधणी या विषयांवर र्सवकष चर्चा होणार आहे तसेच अनेक महत्त्वपूर्ण ठराव पारित करण्यात येऊन उत्तर महाराष्ट्रातील पक्षीसवर्धन चळवळीची दिशा ठरवली जाणार आहे.
संमेलनाच्या संयोजन संस्था पुढील प्रमाणे – पर्यावरण शाळा, डीएनए-धुळे, न्यू कॉन्झरवर, वन्यजीव संवरक्षण  संस्था, अग्निपंख , उडान,उपज,  चातक नेचर कॉन्झरवेशन सोसायटी आणि बारीपडा ग्राम पंचायत इत्यादी.

डॉ. सुधाकर कु-हाडे यांचा अल्प परिचय.….
डॉ. सुधाकर कु-हाडे शेवगाव ( जि. अहमदनगर) येथील कला, विज्ञान महाविद्यालयात प्राणिशास्त्राचे प्राध्यापक असून अहमदनगरच्या निसर्ग मित्र मंडळाचे संस्थापक आहेत, आणि अहमदनगर जिल्ह्याच्या मानद वन्यजीव रक्षक म्हणूनही त्यांच्याकडे जबाबदारी आहे. जळगाव येथे  झालेल्या महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलनाचे अध्यक्षस्थानही त्यांनी भूषविले आहे. डॉ. कु:हाडे पक्षी संवर्धनाबरोबरच संशोधन करीत असतात. त्यांनी ५ लघु संशोधन प्रकल्प आनंद ६२ शोध निबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकामधून प्रसिद्ध झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments