औरंगाबाद महापालिकेत दोन नगरसेवकांकडून खुर्च्यांची फेकाफाकी

- Advertisement -

औरंगाबाद : महापालिकेच्या सर्वसधारण सभेत पाण्याच्या प्रश्नावरून एमआयएम च्या नगरसेवकांनी अभूतपूर्व गोंधळ घालत सभागृहात खुर्च्या भिरकावल्या. यातच महापौरांसमोर जात सुरक्षा रक्षकाला मारहाण केली यावेळी दोन खुर्च्या महापौरांना लागल्या. गोंधळ घालणा-या दोन नगरसेवकांचे सदस्यत्व कायमस्वरूपी रद्द करण्यात आल आहे.
औरंगाबाद महानगरपालिकेची प्रत्येक सभेत गोंधळ नित्याचा झाला आहे. यावेळी पालिका सर्वसाधारण सभेत पाणी प्रश्नांवर एमआयएम च्या नगरसेवकांनी गोंधळ घातला. यावेळी आक्रमक झालेल्या या सय्यद मतीन व जफर बिल्डर या नगरसेवकांनी महापौरांनासमोर येत सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. तसेच खुर्च्यांची फेकाफेक केली. गोंधळा दरम्यान दोन खुर्च्या महापौरांना लागल्या. गोंधळ वाढत गेल्याने शेवटी पोलिसांना बोलावून दोन्ही नगरसेवकांना सभागृहा बाहेर काढण्यात आले. महापौरांनी त्यांच्यावर कारवाई करत त्यांचे सदस्यत्व कायमस्वरूपी रद्द केले आहे.

- Advertisement -