औरंगाबाद राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा ‘सॅनिटरी नॅपकिन’ करमुक्तीसाठी हल्लाबोल!

- Advertisement -

औरंगाबाद: केंद्र सरकारने सॅनिटरी नॅपकिन वर १२ टक्के वस्तू सेवा कर (जीएसटी) लावण्यात आले. महिल्यांच्या आरोग्याशी संबंधित अतिशय गरजेच्या या सॅनिटरी नॅपकिन वरील वस्तू सेवा कर मागणी करूनही कमी करण्यात आले नाही. सरकारने खाकरा वरील कर त्वरीत कमी केला. मात्र सॅनिटरी नॅपकिन करमुक्त केले नाही. या मागणीसाठी  कँनाँट येथील जीएसटी कार्यालया समोर आंदोलन करून वस्तू सेवा कर आयुक्त यांना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले.

महिलांच्या आरोग्याशी निगडीत महत्त्वाच्या असलेल्या सॅनिटरी नॅपकिनकडे दुर्लक्ष केले जाते. सॅनिटरी नॅपकीन चैन नाही,गरज आहे आमची. त्याच्यावर वस्तू सेवा कर का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. मेहराज इसाक पटेल यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करुन निवेदन सादर करण्यात आले. यावेळी मंजुषा पवार,शमा खान,शकीला खान,सुभद्रा जाधव,सलमा बानो,अनिसा बेगम,सलमा बेगम,शोभा गायकवाड,भाग्यश्री राजपुत,यांच्यासह इतर महिला कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. सॅनिटरी नॅपकिनवरील कर लवकरात लवकर कमी करण्यात आले नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. असा इशारा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने निवेदणाव्दारा यावेळी देण्यात आला आहे.

- Advertisement -