‘कुंकू’फेम अभिनेता प्रफुल्ल भालेरावचे रेल्वे अपघातात निधन

- Advertisement -

महत्वाचे….
१.मुंबईत मालाड रेल्वे स्थानकाजवळ त्याचा मृतदेह सापडला
२.‘कुंकू’ मालिकेत साकारलेल्या जानकीच्या भावाच्या भूमिकेमुळे घराघरात पोहचला
३. स्टार प्रवाहवरील ‘नकुशी’ मालिकेतही महत्त्वपूर्ण भूमिका


मुंबई: झी मराठी वाहिनीवरील गाजलेल्या कुंकूमालिकेत बालकलाकाराची भूमिका साकारणारा उदयोन्मुख अभिनेता प्रफुल्ल भालेरावचे अपघाती निधन झाले आहे. मुंबईत मालाड रेल्वे स्थानकाजवळ त्याचा मृतदेह सापडला.

‘कुंकू’ मालिकेत त्याने साकारलेल्या जानकीच्या भावाच्या भूमिकेमुळे प्रफुल्लचा चेहरा घराघरात पोहचला होता. या मालिकेशिवाय त्याने कलर्स वाहिनीवरील ‘तू माझा सांगती’, आवाज- ज्योतिबा फुले, स्टार प्रवाहवरील ‘नकुशी’ मालिकेतही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. अलीकडे प्रदर्शित झालेल्या ‘बारायण’ सिनेमातही त्याने भूमिका केली होती. प्रफुल्लच्या आकस्मित जाण्याने त्याच्या मित्र-परिवारासह मनोरंजन विश्वालाही धक्का बसला आहे.

- Advertisement -
- Advertisement -