खारघर रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षाचालकांच्या दोन गटात हाणामारी

- Advertisement -

खारघर : रिक्षाचालकांमध्ये हद्दीच्या वादातून नवी मुंबईत खारघर रेल्वेस्थानका बाहेर दोन रिक्षाचालक संघटनामध्ये तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत रिक्षाचालक तर एक पोलिस जखमी झाला. दोन्ही संघटनांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले.

नवी मुंबईतील खारघर रेल्वे स्टेशनबाहेर तळोजा आणि खारघऱ ऑटो रिक्षाचालकांमध्ये ऐन संध्याकाळी तुफान हाणामारी पाहण्यास मिळाली. तळोजामधून येणाऱ्या रिक्षाचालकांनी खारघरमध्ये प्रवासी नेऊ नये. त्यामुळे आमच्या उत्पन्नावर परिणाम होतोय असा खारघरच्या रिक्षाचालकांचा आक्षेप होता. त्यामुळे दोन्ही गटामध्ये बाचाबाची झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही गटातील रिक्षाचालकांनी एकमेकांवर तुफान हल्ला केला. हा वाद सोडवण्यासाठी नवी मुंबई पोलीस घटनास्थळी पोहोचले. पण या धुमश्चक्रीत पोलीसही जखमी झाले. खारघर रेल्वेस्थानकाबाहेर पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.

- Advertisement -