ग्रामपांचायतींचा निकाल: धुळे नगांव ग्रामपंचायतीत सासूविरुद्धच्या लढाईत सुनेचा विजय

- Advertisement -

धुळे: नगांव ग्रामपंचायत निवडणुकीत सासूविरुद्धच्या लढाईत सुनेचा विजय झाला आहे. धुळे तालुक्यातील सरपंचपदी पंचायत समितीच्या माजी सभापती ज्ञानज्योती भदाणे यांनी सासू सुशिला दत्तात्रय भदाणे यांचा पराभव केला.

अहमदनगर :तालुक्यात २८ पैकी २७ ग्रामपंचायतींची मतमोजणी पूर्ण, एका ठिकाणी सरपंचाचा अर्ज बाद झाला आहे.

जालन्यातील घनसावंगीत तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व

- Advertisement -

बोलगाव : सरपंचपदी लक्ष्मण शेळके ( राष्ट्रवादी पुरस्कृत)

पिरपगवाडी : सरपंचपदी शकुंतला पाटेकर (राष्ट्रवादी)
हातडी : सरपंचपदी राम शिंदे (राष्ट्रवादी)
लिंबी : सरपंचपदी सुनील तौर (राष्ट्रवादी)

दैठणा बु. : सरपंचपदी रंजना धांडे (राष्ट्रवादी)

जळगाव :बोदवड निमखेड ग्रामपंचायतीच्या सर्व सात जागा भाजपाच्या हाती, बनुबाई रमेश सुरुंगे यांची सरपंचपदी निवड.
– यावल तालुक्यातील कासारखेड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अपक्ष भागवत शंकर पाटील वियजी.

– चितोळा ग्रामपंचायतीचे सरपंचपद सलीमा सलीम तडवी यांच्याकडे

– चिखली बुद्रुकच्या सरपंचपदी कासाबाई कौटिक कोळी यांची निवड
– चुनचाळे येथील सरपंचपदाच्या चुरशीत सुनंदा संजय पाटील यांची बाजी.

औरंगाबाद: पैठण तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींमध्ये शिवसेना, राष्ट्रवादीचे वर्चस्व

-सिल्लोड ग्रामपंचायतीत दोन उमेदवारांना समान मते मिळाली. त्यामुळे चिठ्ठी टाकून विजयी उमेदवार घोषित करण्यात आला आहे.

धनगाव- सरपंच बापूसाहेब कातबने शिवसेना
टाकळी- सरपंच ऊमेदवार महेश सोलाटे विजयी भाजप

नाशिक: राष्ट्रवादी समर्थक दिलीप बनकर यांच्या भाऊजयी अलका अशोकराव बनकर या पिपळगावच्या सरपंच म्हणून मोठ्या फरकाने विजयी झाल्या आहेत.

– निफाड पंचायत समिती माझी सभापती वैशाली भास्करराव बनकर पराभूत.

मालेगाव : राज्यमंत्री दादा भुसे यांना धक्का, सौंदाणे ग्रामपंचायत सरपंचपदी डॉ. मिलिंद पवार विजयी, तर दाभाडी ग्रामपंचायत सरपंचपदी भाजपाच्या चारूशिला निकम यांचा विजय.

सरासरी ७९ टक्के मतदान…
८ ऑक्टोबरला घेण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यात सरासरी ७९% मतदान झाले असल्याची माहितीत राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली आहे. पहिल्यांदाच सरपंचपदासाठी थेट निवडणूक होणार घेण्यात आल्याने मतदानापूर्वी राजकीय पक्षांमध्ये चांगली चुरस पाहायला मिळाली. याचा फायदा भाजपला होऊ शकतो असा अंदाज बांधण्यात येत आहे. त्यामुळे आजच्या ग्रामपंचायतीच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा समावेश…
औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, जालना, लातूर, हिंगोली, नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार, अहमदनगर, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा या जिल्ह्य़ांमधील एकूण ३१३१ जागांसाठी मतदान घेण्यात आलं होतं.

- Advertisement -