घोडबंदर रोड, बालेवाडीतील नवीन बांधकामांवरील स्थगिती कायम

पुण्याचे नगरसेवक अमोल बालवडकर आणि ठाण्याचे रहिवासी मंगेश शेलार यांनी जनहित याचिका दाखल केली आहे.

- Advertisement -

मुंबई : ठाण्यातील घोडबंदर आणि पुण्यातील बालेवाडी येथील नवीन बांधकामांवरील स्थगिती मुंबई हायकोर्टानं आठवड्याभरासाठी कायम ठेवण्यात आली आहे. यासोबतच पुढील आठवड्य़ापर्यंत नवीन बांधकामानां ओसी देण्यावरही स्थगिती कायम करण्यात आली आहे. बालेवाडीत नवीन बांधकामांच्या ठिकाणी पाणीपुरवठा सुरु केल्याचा पुणे महापालिकेनं कोर्टात दावा केला आहे. मुंबई हायकोर्टाच्या वतीनं याचिकाकर्त्यांना पालिकेच्या माहितीची पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुण्याचे नगरसेवक अमोल बालवडकर आणि ठाण्याचे रहिवासी मंगेश शेलार यांनी जनहित याचिका दाखल केली आहे.

- Advertisement -