ठाण्यात तीन अल्पवयीन मुलींची छेड काढणारा आरोपी गजाआड!

- Advertisement -

ठाणे : ७ वर्षीय मुलीला एका इसमानं राहत्या घरात नेऊन तिचा विनयभंग केल्याचा प्रकार घोडबंदर रोडवरील डोंगरीपाडा परिसरात उघडकीस आला. रामधनी राजभर (३२) असं या आरोपीचं नाव आहे. या प्रकरणी कासारवडवली पोलिसांनी आरोपी रामधनी राजभर याला अटक केली. न्यायालयानं त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत. दरम्यान या प्रकारानंतर याच आरोपीकडून आणखी दोन बालिकांचा विनयभंगाचा प्रकारही उघडकीस आला आहे.

सोमवारी सायंकाळी ६ वाजल्याच्या सुमारास घरात नेऊन ७ वर्षीय मुलीचा विनयभंग केला. सदरच्या प्रकारानंतर मुलगी आरोपीच्या घरातून बाहेर पडताना तिला मोठ्या बहिणीनं पहिलं. तेव्हा मुलीनं घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीच्या कुटुंबांनी मुलीला ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात नेऊन तपासणी केली आणि कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी रामधनी राजभर याच्या विरोधात ३५४ ब, ३४२सह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या सगळ्या गैरकृत्यामुळे आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. पण या घटनेनं डॉगरीपाड्यात वातावरण तणावपूर्ण आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कासारवडवली पोलीस करीत आहेत. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता ढोले यांनी नागरिकांना कठोर कारवाईचे आदेश दिले आहे.

- Advertisement -