डीएसकेंना अखेरची संधी, २२ जानेवारीपर्यंत पैसे भरण्याचे कोर्टाचे आदेश!

- Advertisement -

पुणे : बिल्डर डी.एस.कुलकर्णी यांना आणखी एकदा दिलासा मिळालाय. हायकोर्टाने डीएसकेंना २२ जानेवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण कायम ठेवलंय. मात्र,डीएसकेंना २२ जानेवारीपर्यंत पैसे भरण्याचे आदेश दिले आहे.

हायकोर्टाच्या आदेशांप्रमाणे डीएसकेंनी ५० कोटी रुपये १९ जानेवारीपर्यंत जमा करण्याची कबुली सर्वोच्च न्यायालयात दिली होती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना १९ जानेवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलेलं आहे. पण ही मुदत संपायला काही तास उरलेले असताना अजूनही डीएसके यांनी ५० कोटी रुपये भरले नसल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांनी हायकोर्टत धाव घेतली होती.

- Advertisement -

त्यांच्या अर्जावर २२ जानेवारीला सुनावणी ठेवून हायकोर्टाने तोपर्यंत संरक्षण कायम ठेवले आणि त्या दिवसापर्यंत रजिस्ट्रीमध्ये पैसे जमा करण्यासही हायकोर्टाने आदेश दिले आहे. यावेळी हायकोर्टाने २२ तारखेला सुनावणी ठेवल्यानं डीएसकेंना थोडासा दिलासा मिळालाय.​

- Advertisement -