दिवेआगार सुवर्ण गणेश मंदिर दरोडा प्रकरणी दहाजण दोषी

- Advertisement -

अलिबाग: दिवेआगार सुवर्ण गणेश मंदिर दरोडा आणि दुहेरी हत्याकांड प्रकरणातील १२ पैकी १० जणांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. तर उर्वरित दोघांची पुराव्याअभावी मुक्तता करण्यात आली. पुराव्याअभावी सगळ्या आरोपींवर असेला मोक्का हटवण्यात आला आहे. आता आरोप निश्चित केलेल्या दहा जणांना १६ ऑक्टोबर रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे.

२४ मार्च २०१२ रोजी दिवेआगार येथील मंदिरातील दीड किलो वजनाची मूर्ती दरोडेखोरांनी चोरून नेली होती. या मूर्तीचे वजन दीड किलो होते. या प्रकरणी तपास अधिकारी संजय शुक्ला आणि व्ही.व्ही गायकवाड यांनी ऑक्टोबर २०१२ मध्ये दोषारोपपत्र दाखल केले होते. महाराष्ट्र राज्य संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा अर्थात मोक्काच्या कलम ३ (१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आज झालेल्या सुनावणीत मोक्का हटवण्यात आला आहे.

- Advertisement -

गणेश मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेले शुटिंग, त्यांनी वापरलेल्या मोबाईल सीमकार्डचे टॉवर लोकेशन यामुळे घटनेची मांडणी करण्यात पोलिसांना यश आले. तसेच दरोड्यासाठी वापरण्यात आलेली पहार, चोरीला गेलेली दानपेटी आणि १ किलो २४६ ग्रॅम सोन्याची लगडी जप्त करण्यात पोलिसांना यश आले. अलिबाग येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयात या प्रकरणी सुनावणी सुरु होती. आता या आरोपींना १६ ऑक्टोबरला शिक्षा सुनावली जाणार आहे.

- Advertisement -