धर्मा पाटील यांच्या निधनानंतर संतप्त ग्रामस्थांचा ‘रास्ता रोको’

- Advertisement -

शिंदखेड  : शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथील शेतकरी धर्मा पाटील यांच्या निधनानंतर सोमवारी सकाळी संतप्त ग्रामस्थांनी दोंडाईचा-विखरण रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करीत पाटील कुटुंबीयांना न्याय मिळावा; या मागणीसाठी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच शासनाच्या विरोधात तीव्र संतापही व्यक्त केला.

विखरण येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी धर्मा मंगा पाटील (८०) यांच्या जमिनीला योग्य मोबदला न मिळाल्याने त्यांनी गेल्या सोमवारी थेट मंत्रालयात विष प्राशन केले. तेव्हापासून त्यांच्या प्रकृती ही चिंताजनक होती. त्यांच्यावर मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी रात्री 10 वाजून 45 वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच विखरण ग्रामस्थांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती. त्यांच्यावर मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा नरेंद्र पाटील हे होते. मात्र, त्यांनी योग्य न्याय मिळत नाही. तोर्पयत त्यांचे पार्थिव उचलणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. त्यातच त्यांच्या विखरण गावातही धर्मा पाटील यांच्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात ग्रामस्थांनी एकत्र येत सोमवारी सकाळी आंदोलन के ले. त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

–  काबाडकष्ट करून शेती करणारे धर्मा पाटील यांच्या पश्चात पत्नी सकूबाई पाटील, मुलगा नरेंद्र व महेंद्र पाटील, सून सुनीता व मनीषा पाटील, तसेच मुली रंजना विजयराव सोनवणे (हातेड), रेखा सतीश निकम (देवगाव) व प्रतिभा प्रदीप पवार (गंगापुरी, ता. अमळनेर) असा परिवार आहे.
– प्रस्तावित सौर प्रकल्पासाठी त्यांच्या जमिनीला केवळ ४ लाख ३ हजार रुपयांचा मोबदला मिळाला होता. परंतु, त्यांच्या शेत जमिनीला लागून असलेल्या शेतमालकास १ कोटी ८९ लाख रुपये मिळाले होते. त्यामुळे त्यांच्यावर झालेला अन्यायाविरोधात त्यांचा प्रशासन व शासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू होता.
– धर्मा पाटील यांच्या निधनामुळे विखरण गावात शोककळा पसरली आहे.

- Advertisement -
- Advertisement -