‘धर्मा पाटील यांच्या मृत्यूची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा’

- Advertisement -

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणात सरकारवर ३०२ चा गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत होते. आता सरकारी अनास्थेला कंटाळून धर्मा पाटील या शेतकऱ्याने मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूसाठी फडवणीस सरकार कारणीभूत आहे, असा आरोप करत सरकारवर ३०२चा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी आम आदमी पक्षाने केली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, असेही ‘आपने म्हटले आहे. ‘आप’च्या नेत्या प्रीती मेनन यांनी त्याबाबचं प्रसिद्धी पत्रक काढत ही मागणी केली आहे.

- Advertisement -