नांदेडमध्ये एमआयएमचा सुपडासाफ

- Advertisement -

नांदेड: नांदेड वाघाळा महापालिका निवडणूकीत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांच्या आई जकिया बेगम यांच्यासह सर्व उमेदवारांचा पराभव झाला. जकिया बेगम यांना प्रभाग १४ मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. येथे काँग्रेसच्या उमेदवार शबाना बेगम २५० मतांनी विजयी झाल्या.

एमआयएमचे मागच्या निवडणूकीत ११ नगरसेवक निवडूण आले होते. यंदा एमआयएमचा सुपडासाफ झाला. एमआयएमचे औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलिल,पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदोद्दीन ओवेसी,तसेच हैदराबादचे नेते,औरंगाबादचे नगरसेवक सर्व यंत्रणा नांदेडमध्ये प्रचारासाठी लागली होती. एमआयएमच्या सभांमध्ये गर्दीही मोठ्या प्रमाणात दिसून येत होती. मात्र एमआयएमला मतदारांनी स्पष्टपणे नाकारले असल्याचे बुधवारच्या निकालावरुन स्पष्ट झाले.

- Advertisement -