नागपूरात डॉक्टरांच्या संपाचा तिसरा दिवस

- Advertisement -

 

नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या डॉक्टरांच्या संपाचा आज तिसरा दिवस आहे. सुरक्षेच्या मुद्यावरून  ४०० निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर गेलेत. फक्त अत्यावश्यक शस्त्रक्रिया सोडता सर्व शस्त्रक्रिया होणार नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय.ओपीडीसुद्धा या आंदोलन काळात बंद आहे.

नागपूर मेडिकलच्या आवारात एका महिलेची हत्या झाल्यानंतर मार्डनं हे आंदोलन पुकारलंय. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयांतील सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी महाराष्ट्र सुरक्षा दलावर देण्यात आली आहे. पण १९ सप्टेंबरपासून हे सुरक्षा रक्षक संपावर गेले असल्याने मेडिकलची सुरक्षा वाऱ्यावर आहे.

- Advertisement -

नेमकं हे हत्या प्रकरण काय आहे?

७ ऑक्टोबरला नागपूर मेडिकल कॉलेजच्या आवारात तरुण महिलेचा मृतदेह सापडला, महिलेचा चेहरा दगडानं ठेचला होता

वॉर्ड क्र. ४९  च्या शेजारच्या झुडपात हा मृतदेह सापडला

महाराष्ट्र सुरक्षा दलाचे कर्मचारी १९ सप्टेंबरपासून संपावर

मेडिकल कॉलेजमधल्या महिलांच्या सुरक्षेचं काय?

- Advertisement -