नायर हॉस्पिटलमध्ये एमआरआय मशिनमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू

- Advertisement -

महत्वाचे…
१.एमआरआय सेंटरमध्ये कोणतीही धातूची वस्तू घेऊन जाण्यास परवानगी नसते.
२. राजेशला एमआरआय रूममध्ये ऑक्सिजनचा सिलेंडर आणायचा असल्याचं सांगितलं.
३. आतमध्ये जाताच  अचानक सिलेंडर सकट तो एमआरआय मशिनमध्ये ओढला गेला


मुंबई : मुंबईतील नायर हॉस्पिटलमध्ये निष्काळजीपणाचा कळस गाठल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे राजेश मारू या ३२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. आपल्या बहिणीच्या सासूला एमआरआय करण्यासाठी घेऊन गेलेल्या राजेशचाच एमआरआयच्या मशिनमध्ये खेचल्या गेल्यामुळे मृत्यू झाला. 

एमआरआय सेंटरमध्ये कोणतीही धातूची वस्तू घेऊन जाण्यास परवानगी नसते. राजेश मारू आपल्या बहिणीच्या सासूला बघायला नायर हॉस्पिटलमध्ये गेला होता. पेशंटचा त्यावेळी एमआरआय करायचा असल्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्याने राजेशला एमआरआय रूममध्ये ऑक्सिजनचा सिलेंडर आणायचा असल्याचं सांगितलं.एमआरआय रूममध्ये धातूची वस्तू नेण्यास मज्जाव असतो. पण एमआरआय मशिन बंद  आहे त्यामुळे सिलेंडर आत नेण्यास हरकत नाही असं वॉर्डबॉयने त्याला सांगितलं. राजेश सिलेंडर आत घेऊन गेला. मात्र आतमध्ये मशिन सुरूच होत्या. आतमध्ये जाताच  अचानक सिलेंडर सकट तो एमआरआय मशिनमध्ये ओढला गेला आणि सिलेंडरचा व्हॉल्व लीक होऊन ऑक्सिजन बाहेर येऊ लागला. राजेशचा हात एमआरआय मशिनमध्ये अडकला. अखेर कर्मचा-यांच्या सहाय्याने कसंबसं त्याला बाहेर काढण्यात आलं. मात्र उपचारा दरम्यान त्याला वाचवण्यात अपयश आलं आणि राजेशचा मृत्यू झाला. 

- Advertisement -

एमआरआय मशिन ही इलेक्ट्रोमॅग्नेटीक असते. ही दुर्घटना घडली त्यावेळी मृत राजेश याच्या हातात ऑक्सिजन सिलिंडर होते. त्यामुळे हे सिलिंडर मशीनकडे आकर्षिले जाऊन त्यातील गॅस बाहेर आला. हा गॅस राजेशच्या पोटात जाऊन त्याचे पोट फुगू लागले व गॅसच्या दाबामुळे त्याचे डोळे बाहेर आले. या घटनेत राजेशचा जागीच मृत्यू झाला. राजेश आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेला होता. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे राजेशचा मृत्यू झाल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे.

- Advertisement -