नारायण राणेंकडून अशोक चव्हाणांचे अभिनंदन,भाजपला आत्मपरीक्षणाचा सल्ला !

- Advertisement -

मुंबई, नांदेड मनपातल्या काँग्रेसच्या विजयाबद्दल नारायण राणेंनी अशोक चव्हाणांचं जाहीर अभिनंदन केलंय. तर भाजपला आत्मपरीक्षणाचा सल्ला दिलाय. मुख्यमंत्र्यांनी २ जाहीर सभा घेऊनही नांदेडात भाजपला पराभवाचा सामना करावा लागत असेल तर प्रदेश भाजप नेत्यांनी आतातरी आत्मपरिक्षण केलं पाहिजे, असंही नारायण राणेंनी म्हटलंय.

विशेष म्हणजे एनडीएच्या उंबरठ्यावर असतानाही नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांना हा असा आत्मपरीक्षणाचा जाहीर सल्ला दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात. कारण याच अशोक चव्हाणांवर टीकास्त्रं सोडून नारायण राणेंनी काँग्रेस सोडली आणि स्वतःचा पक्ष स्थापन केलाय. अर्थात या जाहीर अभिनंदनाबद्दल अशोक चव्हाणांनीही नारायण राणेंचे जाहीरपणे आभार मानलेत.

दरम्यान, नांदेडच्या पराभवावरून नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवरही टीकास्त्रं सोडलंय. भाजप नेत्यांप्रमाणेच उद्धव ठाकरेंनीही नांदेडच्या पराभवाचं आत्मपरीक्षण करावं असं नारायण राणेंनी म्हटलंय. पण नांदेडवरून महाराष्ट्राचं चित्र पालटेल अशी अपेक्षा करू नका, असं सांगायलाही नारायण राणे विसरले नाहीत.

- Advertisement -
- Advertisement -