पत्नी व मुलाची हत्या करुन आयटी इंजिनियरने केली आत्‍महत्‍या !

- Advertisement -

पुणे – बाणेर-पाषाण लिंक रोडवर एका आयटी इंजिनिअरने पत्नी व चार वर्षाच्या मुलासह जीवन संपवल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. जयेशकुमार पटेल (३४), भूमिका पटेल (३०) आणि नक्ष (४) अशी मृतावस्थेत आढळलेल्या पटेल कुटुंबीयांची नावे आहेत. वसंत विहार सोसायटीत ही घटना घडली.

जयेशकुमार पटेल हे आयटी इंजिनिअर होते. महिना दीड लाख पगारावर ते एका नामांकित कंपनीत नोकरीला होते, तर त्यांची पत्नी भूमिका गृहिणी होती. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून त्यांचे घर आतून बंद होते. त्यामुळे शेजार्‍यांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला रात्री ११ वाजता याबद्दल माहिती दिली.
त्यानंतर चतृशृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दुसऱ्या इमारतीच्या बाल्कणीतून पोलीस पटेल यांच्या घराजवळ पोहोचले. दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता त्यांना पटेल कुटुंब मृतावस्थेत आढळून आले.
यावेळी पती-पत्नीच्या गळ्याभोवती दोरीचे व्रण असून मुलगा नक्ष याच्या तोंडातून फेस आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे एकाच वेळी दोघांनी गळफास घेतला असावा किंवा पत्नीचा व मुलाचा खून करून पतीने स्वत: आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यांचे मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

- Advertisement -