पद्मावत’ सिनेमाचा वाद चिघळला, वाहनांची जमावाकडून तोडफोड

- Advertisement -

पुणे – बहुचर्चित संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ सिनेमाला असणाऱ्या वादाचे पडसाद मंगळवारी रात्री पुण्यात उमटले. २० ते २५ तरुणांच्या जमावाने सिनेमाच्या विरोधात घोषणाबाजी करत वारजे पुलावर वाहनांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली.

हातात भगवे झेंडे घेतलेल्या तरुणांनी गाड्या अडवून काचा फोडल्या तसेच चाकांची हवा सोडली. सातारा येथील महेश भापकर यांच्या ट्रकचे तोडफोडीत मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी भापकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -