बदलापूरमध्ये रिक्षासंघटनांकडून ‘रिक्षाचालकांना’ बोनस

- Advertisement -

बदलापूर: रिक्षाचालकाला बोनस मिळालाय म्हटल्यावर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या असतील. पण हे खरं आहे. बदलापुरातल्या २७४ रिक्षाचालकांना २५ लाखांचा बोनस मिळालाय.

बदलापूरमध्ये रिक्षा संघटनेकडून गेल्या पंधरा वर्षांपासून बोनस योजना राबवली जातेय. रोजच्या कमाईतल्या पैशांतून थोडी थोडी बचत करून रिक्षावाले संघटनेकडं पैसे जमा करतात. दिवाळीला ते पैसे बोनस म्हणून मिळातात. यंदा बदलापूरातल्या रिक्षावाल्यांनी जवळपास पंचवीस लाख रुपये बोनस स्वकष्टार्जित बोनस मिळवला आहे.सुखदेव अहिरे या रिक्षाचालकांना तर तब्बल १ लाखाचा बोनस मिळाला आहे.

असंघटीत क्षेत्रातल्या कामगारांच्या दिवाळीला बोनसच्या नावानं नेहमीच शिमगा असतो. पण बदलापूरचे रिक्षावाले वर्षभर नियोजन करतात त्यामुळेच त्यांची दिवाळी खास होऊ लागली आहे.

- Advertisement -
- Advertisement -