मनसेची साथ न सोडणारा एकमेव नगरसेवक कोण?

- Advertisement -

मुंबई : ‘मुंबई महापालिकेत लवकरच आमचा महापौर बसवू’ अशी बतावणी करणाऱ्या भाजपला शिवसेनेने एक जोरदार धक्का दिला आहे. मुंबई महापालिकेतील मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक हे शिवसेनेसोबत गेले आहेत.

मनसेचे मुंबई महापालिका निवडणुकीत सात नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी सहा नगरसेवकांनी सोडचिठ्ठी दिल्याने संजय तुर्डे हे एकमेव नगरसेवक सध्या मनसेसोबत आहेत. संजय तुर्डे यांच्यावर मुंबई महापालिका निवडणुकीनंतर विरोधी उमेदवाराकडून हल्ला झाला होता. पक्षासाठी हल्ला सहन करणारे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे मनसेसोबत आहेत.

कोण आहेत संजय तुर्डे?

- Advertisement -

संजय तुर्डे हे कुर्ल्यातील वॉर्ड क्रमांक १६६ चे नगरसेवक आहेत. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर संजय तुर्डे आपल्या कार्यकर्त्यांसह घराबाहेर जल्लोष साजरा करत होते. परंतु याचवेळी संजय तुर्डे आणि  २० ते २५ कार्यकर्त्यांवर हल्ला झाला. ज्यात तुर्डे यांच्यासह पाच कार्यकर्ते गंभीर जखमी झाले होते. भाजपचे पराभूत उमेदवार सुधीर खातू यांनी हल्ला केल्याचा आरोप संजय तुर्डे यांनी केला होता.

- Advertisement -