मराठमोळ्या डॉ. रखमाबाई राऊत यांचा गूगलकडून सन्मान

- Advertisement -

मुंबई – ब्रिटीशांच्या भारतीय वसाहतीमधील पहिल्या महिला डॉक्टर रखमाबाई यांचा गूगलने डुडलच्या माध्यामातून सन्मान केला आहे. आज त्यांचा जन्मदिवस आहे. डॉ. रखमाबाई यांचा जन्म मुंबईत झाला होता. 

मराठमोळ्या डॉ. रखमाबाई राऊत या भारतात वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर आहे. रखमाबाई यांचा जन्म २२ नोव्हेंबर १८६४ ला मुंबईत झाला. रखमाबाई यांच्या आईचा बालविवाह झाला होता. वयाच्या १४ व्या वर्षी रखमाबाईंच्या आईचे म्हणजे जयंतीबाईंचे लग्न झाले होते, १५ व्या वर्षी रखमाबाईंच्या रुपाने मुलगी झाली आणि १७ व्या वर्षी त्यांचा पती म्हणजे रखाबाईंच्या वडिलांचे निधन झाले. अवघ्या १७ व्या वर्षी जयंतीबाई विधवा झाल्या आणि रखमाबाईंच्या डोक्यावरील पितृछत्र हरपले. पुढे जयंतीबाईंनी डॉ. सखाराम राऊत यांच्याशी दुसरे लग्न केले.
रखमाबाई यांनी ज्यावेळी औषध अभ्यास करण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा लंडन स्कूल ऑफ मेडिसीन येथे इंग्लंडमध्ये त्यांच्या प्रवासाला आणि अभ्यासाला पाठिंबा देण्यासाठी एक निधी तयार करण्यात आला. त्यानंतर त्या इंग्लंडला गेल्या आणि एक योग्य डॉक्टर म्हणून भारतात परतल्या. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी राजकोटच्या महिला हॉस्पिटलमध्ये अनेक वर्षे काम केले.

- Advertisement -