मातीचं घर कोसळून कुटुंबातील चौघांचा मृत्यू

- Advertisement -

जळगाव : जळगावमध्ये मातीचं घर कोसळून चौघांचा मृत्यू झाला. पारोळा शहरातील काझी वाडामध्ये जीर्ण झालेल्या मातीच्या घरांचं छत आज पहाटे साडे पाचच्या सुमारास कोसळलं. या दुर्घटनेत चादर व्यवसायिक असलेल्या काझी कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला, तर एकाला वाचवण्यात यश आलं आहे.

घर कोसळल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने बचावकार्य सुरु केलं, पण त्यात त्यांना यश मिळालं नाही. सायराबी भिकन काझी (वय ५० वर्ष), आशिम भिकान काझी (वय २३ वर्ष), मोईन भिकन काझी (वय १८ वर्ष), शबिना भिकान काझी (वय १७ वर्ष) अशी मृतांची नावं आहेत.

- Advertisement -
- Advertisement -