मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस, पावसामुळे पसरले अंधाराचे साम्राज्य

गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं पुन्हा एकदा मुंबईत आगमन झालं आहे. मुंबईसह राज्यभरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळतोय.

- Advertisement -

मुंबई– गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं पुन्हा एकदा मुंबईत आगमन झालं आहे. मुंबईसह राज्यभरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळतोय. फोर्ट, कुलाबा, चर्चगेट, मरिन लाइन्स परिसरात अंधारून आले आहे. विजांचा कडकडाट आणि पावसाच्या सरी कोसळत आहेत. मुसळधार पावसामुळे लोअर परेल स्थानकाच्या फलाट क्रमांक १ वरच्या गळक्या छापरातून पाणी टपकतंय. तर नवी मुंबईमध्येसुद्धा कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अंधाराचे साम्राज्य पसरले असून, सोसाट्याचा वारा सुटला आहे. नेरुळ येथील डी. वाय. पाटील स्टेडियम येथे फिफा वर्ल्डकप स्पर्धा पाहण्यासाठी फुटबॉलप्रेमींनी गर्दी केली असून,  सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसाने तारांबळ प्रेक्षकांची अक्षरशः तारांबळ उडाली आहे.

- Advertisement -