मुंबई महापालिका रुग्णालयात महागाईचा ‘डोस’!

- Advertisement -

मुंबई – रुग्णालय शुल्कात वाढ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतल्याने आता मुंबई महापालिकेची रुग्णालये महागणार आहेत. त्यामुळे मुंबई बाहेरील रुग्णांसाठी ३० टक्के वाढ, तर मुंबईतील नागरिकांना उपचारासाठी २० टक्के वाढीव शुल्क द्यावे लागणार आहे. मात्र, ज्येष्ठ नागरिकांना महापालिका रुग्णालयात मोफत उपचार मिळणार आहेत. महापालिकेने रुग्णालये महाग होणार असल्यामुळे रुग्णांना ‘महागाईचा डोस’मिळणार आहे. यामुळे रुग्णांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.

मुंबई महापालिकेच्या सभागृहात या शुल्कवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर ही शुल्कवाढ महापालिका रुग्णालयात लागू होईल. महापालिका रुग्णालये अत्याधुनिक करण्याठी ही दरवाढ करण्यात आल्याचे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. असे असले तरी एमआरआय आणि सिटीस्कॅन यासारख्या सुविधा यातून वगळ्यात आल्या आहेत.
पालिका रुग्णालयात मुंबईकरांसोबतच मुंबई बाहेरील रुग्णही मोठ्या संख्येने उपचार घेतात. पालिकेच्या केईएम, नायर आणि लोकमान्य टिळक या तीन रुग्णालयांवर महापालिका वर्षाला ६०० ते ७०० कोटी रुपये खर्च करते. त्यापैकी १० टक्केही उत्पन्न पालिकेला मिळत नाहीत. तशीच अवस्था इतर रुग्णालयांची आहे. म्हणून पालिका रुग्णालयातील सेवा अद्ययावत करण्यासाठी शुल्कवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -