- Advertisement -
मुंबई: मुंबई महापालिकेत १ लाख १० हजार कर्मचाऱ्यांना बुधवारी दिवाळी बोनस जाहीर करण्यात आले. प्रत्येक कर्मचाऱ्याला १४ हजार ५०० रुपये बोनसची रक्कम दिली जाणार आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंद पसरला आहे. एकीकडे बेस्ट तोट्यात चालत असल्याचे सुरु असतांना बोनसचे काय होणार यावर चर्चा सुरु होती. मात्र बोनस जाहीर होताच कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
- Advertisement -