मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावात भाजपाचा पराभव

- Advertisement -

नागपूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नागपूर जिल्ह्यातील फेटरी गावात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला धक्का बसला आहे. सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपा पुरस्कृत उमेदवार ज्योती राऊत यांचा पराभव झाला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस पुरस्कृत धनश्री ढोमने यांनी त्यांचा पराभव केलाय. ग्रामपंचायत सदस्य निवडणुकीत एकूण नऊ जागांपैकी भाजपा पुरस्कृत ५ सदस्य तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पुरस्कृत ४ सदस्य निवडूण आले आहेत.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दत्तक घेतलेल्या सुरादेवीतही भाजपाला धक्का बसला आहे. तिथे काँग्रेस पुरस्कृत सुनील गंगाराम दुधपचारे विजयी झाले आहेत. बावनकुळेंचे मुळ गाव असलेल्या खसाळा ग्रामपंचायतीत भाजपाला यश मिळाले आहे. तिथे सरपंचपदी भाजप समर्थित रवी पारधी विजयी झाले आहेत.

सिंधुदुर्गात राणेंच्या समर्थ विकास पॅनलचे वर्चस्व
सिंधुदुर्ग जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या समर्थ विकास पॅनलने कमाल करुन दाखवली आहे. कोकणात राणेंनी वेगळी चूल मांडली आणि ग्रामपंचायत निवडणुकीत उडी घेतली. पहिल्याच प्रयत्नात राणेंनी बाजी मारलेली दिसत आहे. या ठिकाणी शिवसेना आणि काँग्रेसला मोठा संघर्ष करावा लागला आहे. राणेंनी ग्रामपंचायत निवडणूक चांगली कामगिरी केल्याने राणेंचे वर्चस्व पुन्हा एकदा येथे दिसून येत आहे.
तारकर्ली – समर्थ विकास आघाडी
कंदळगाव – समर्थ विकास आघाडी
शिरवल – समर्थ विकास
तळगाव – शिवसेना
देवगडमध्ये- ५ ग्रामपंचायती समर्थ विकास
मालवण – ५ सेना ११ समर्थ
सावंतवाडी -५ भाजप, ३ शिवसेना तर १० समर्थ विकास आघाडी

- Advertisement -

काल १८ जिल्ह्यातील जवळपास ४ हजार ११९  ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासह सदस्यपदासाठी मतदान झाले. यातील साधारण १८०  ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.

- Advertisement -