‘व्हीव्हो घाटकोपर’ नाव तीन दिवसात बदला : मनसे

- Advertisement -

मुंबई : एकीकडे देशात चीनच्या मालाला विरोध होत आहे. र दुसरीकडे चिनी मालाच्या जाहिराती करून मुंबई मेट्रो या मालाच्या विक्रीला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. अन्यथा मनसे स्टाईलने नाव बदलू असा इशारा मनसे तर्फे देण्यात आला.

घाटकोपर मेट्रो स्थानकाचं नाव ‘व्हीव्हो घाटकोपर’ असं केल्याने चिनी बनावटीचा असलेल्या मोबाईलचं नाव घाटकोपर मेट्रो स्थानकाला देणे चुकीचं असल्याचं मनसेचं म्हणणं आहे. या विरोधात मनसेने आज घाटकोपर मेट्रो स्थानकासमोर स्वाक्षरी मोहीम घेतली. पुढील तीन दिवस ही स्वाक्षरी मोहीम सुरु राहणार आहे. हे नाव मेट्रोने बदललं नाही, तर मनसे स्टाईलने हे नाव बदलू, असा इशारा मनसेने दिला आहे.

मुंबई मेट्रोच्या घाटकोपर स्थानकाला रिलायन्सने ‘व्हीव्हो घाटकोपर’ असं नाव दिलं आहे. यापूर्वीही या मार्गावरील पश्चिम द्रुतगती मार्ग (अंधेरी पूर्व) या स्थानकाला खाजगी कंपनीचं नाव देण्यात आलं होतं.

- Advertisement -
- Advertisement -