शांततेचा अतिरेक झाला तर,असंतोषाचा स्फोट होईल : उद्धव ठाकरे

- Advertisement -

मुंबई : ‘आता पंचांग फाडून टाका, सण वगैरे थोतांड बंद करा, असे आदेश निघायचेच बाकी आहेत. ते देखील काढा हवं तर. अशीही आपल्याकडच्या सणांची रया गेली आहेच. शांततेचा अतिरेक झाला तर एक दिवस असंतोषाचा स्फोट होईल.’ अशी तीव्र प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फटाकेबंदीबाबत दिली आहे.

फटाकेबंदीच्या निर्णयानंतर अनेक स्तरातून याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. आता उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाला विरोध केला असल्यानं आता भाजप नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

- Advertisement -
- Advertisement -