Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रसाताऱ्यात दोन्ही राजेंचे समर्थक पुन्हा भिडले,

साताऱ्यात दोन्ही राजेंचे समर्थक पुन्हा भिडले,

साताऱ्यात उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्या गटात राडा झालाय, आणेवाडी टोलनाक्यावरून हा संघर्ष उफाळलाय. पोलिसांनी दोन्ही गटांवर गुन्हे दाखल केलेत.

सातारा: आणेवाडी टोल नाक्यावरून सातारा शहरात कोजागिरीच्या रात्री खा. उदयनराजे भोसले आणि आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटात तुफान राडा झाला आहे. यामध्ये गाड्यांची तोडफोड करण्यात आली असून सातारा शहरात तणावाचे वातावरण आहे.

आणेवाडी टोल नाक्याचे व्यवस्थापन बदलल्यानंतर आज खासदार उदयनराजे यांनी टोल नाक्यावर जाऊन वाहनांची टोल वसुली थांबवली. रात्री उशीरापर्यंत उदयनराजे टोल नाक्यावर तळ ठोकून बसले होते . त्यानंतर आमदार शिवेंद्रराजे यांचे कार्यकर्तेही टोल नाक्याकडे निघाले. तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवले. पोलीस प्रमुख संदीप पाटील आणि उपविभागीय अधिकारी धरणे यांनी शिवेंद्रराजे यांच्याशी चर्चा केली. तेव्हा आधी खासदारांना इकडे बोलवा नाहीतर आम्ही तिकडे जाणार असा पवित्रा शिवेंद्रराजे यांनी घेतला. टोल नाक्यावर उदयनराजे मोठा जमाव घेऊन थांबले होते. तर विश्रामगृहावर शिवेंद्रसिंहराजे मोठा जमाव घेऊन बसले होते. पोलिसांनी उदयनराजे यांना टोल नाक्यावरून जाण्यास सांगितल्या नंतर ते साताऱ्याकडे निघाले. त्यावेळी शिवेंद्रराजे त्यांच्या घरी सुरुची बंगल्यावर आले. उदयनराजे समर्थकांच्या गाड्याही सुरुचीच्या दिशेने आल्याने समोरा समोर दोन्ही गटात राडा झाला.

यात दगडफेकही करण्यात आली. या धुमश्चक्रीत काही कार्यकर्ते आणि एक पोलीस अधिकारीही जखमी झाले. कार्यकर्त्यांच्या गाड्या फुटल्याने उदयनराजे स्वःत पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले  होेते. या सर्व प्रकारामुळे शहरात प्रचंड तणावाचे वातावरण आहे. पोलीसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी दोन्ही गटांवर गुन्हे दाखल केलेत. तसंचे दोन्ही गटांकडूनही परस्परांवर क्रॉस कप्लेंट दाखल केल्यात.

खरंतर खासदार उदयनराजेंच्या शरद पवारांसोबतच्या भेटीनंतर या दोन्ही राजेंमधला संघर्ष मिटणं अपेक्षित होतं. पण साताऱ्यात उटलंच झालंय. आणेवाडी टोलनाक्यावरून आमदार शिवेंद्र राजे आणि खा. उदयनराजे यांचे समर्थक पुन्हा आमनेसामने आल्याचं बघायला मिळालं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments