Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रहा अर्थसंकल्प म्हणजे निव्वळ जुमलेबाजी - राधाकृष्ण विखे पाटील

हा अर्थसंकल्प म्हणजे निव्वळ जुमलेबाजी – राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई : अरुण जेटलींनी आज सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मांडलेला असून ही निव्वळ जुमलेबाजी आहे, अशी खरमरीत टीका राज्याचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी केलीय. रब्बी हंगामात दीडपट हमीभाव वाढवून दिल्याचं अर्थमंत्री सांगत असले तरीही वस्तुस्थिती तशी नाहीये. तसंच जीडीपी वाढला असं सांगितलं गेलंय तर मग त्यानुसार व्यापार कुठे वाढलाय. त्यामुळे हा अर्थसंकल्प म्हणजे सरकारने न केलेल्या प्रगतीचा अर्थमंत्र्यांनी कागदोपत्री मांडलेला निव्वळ देखावा आहे, असंही विखे पाटलांनी म्हटलंय.

विखे पाटील म्हणाले, ”एकलव्य शाळा आदिवासी मुलांसाठी आणणार, हे बोलताना एकलव्य शब्दाला ते अडखळले. यावरूनच त्या शाळांचं धोरण अजूनही नीट तयार नाही. आणि कुठल्या २० लाख मुलांना शाळेत पाठवणार? त्यामुळे हे बजेट म्हणजे, एकलव्याचा अंगठा मागणार्‍या द्रोणाचार्याचा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे सामान्य जनता आता या जुमलेबाजीला अजिबात बळी पडणार नाही.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments