Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्र२००२ च्या नृशंस दंगलीच्या सूत्रधारांचे काय? : डॉ. रत्नाकर महाजन

२००२ च्या नृशंस दंगलीच्या सूत्रधारांचे काय? : डॉ. रत्नाकर महाजन

महत्वाचे..
१. २००८ च्या गुजरात बॉम्बस्फोटाच्या सूत्रधाराला तर अटक झाली
२. नृशंस नरसंहाराचे सूत्रधार असलेली माणसे जी उजळमाथ्याने देशात


मुंबई : २००८ च्या गुजरात बॉम्बस्फोटाच्या सूत्रधाराला तर अटक झाली, पण २००२ च्या नृशंस दंगलीच्या सूत्रधारांचे काय ? त्यांना कधी अटक होणार? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी केला आहे.  

२००८ च्या गुजरात बॉम्बस्फोटाचा सूत्रधार असल्याचा आरोप असणा-या अब्दुल सुभान कुरेशीला अटक करण्यात आल्याची संबंधित यंत्रणांची कृती स्वागतार्ह व अभिनंदनीय आहे. आता याच गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या नृशंस नरसंहाराचे सूत्रधार असलेली माणसे जी उजळमाथ्याने देशात आणि जगात मानव जातीला उपदेश करित फिरत आहेत, त्यांनाही त्वरित कायद्याच्या जाळ्यात अडवकवण्याची धाडसी कृती संबंधित यंत्रणांनी करावी अशी भारतीय जनतेची रास्त अपेक्षा आहे. शब्दाचे पक्के अशी आपली प्रतिमा जाणिवपूर्वक निर्माण करणारे याची दखल घेतील अशी आशा आहे असे डॉ. महाजन म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments