Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रअखेर नाराज नाना पटोलेंनी दिला खासदारकीचा राजीनामा

अखेर नाराज नाना पटोलेंनी दिला खासदारकीचा राजीनामा

भंडाराभंडाऱ्याचे  भाजपचे खासदार नाना पटोले आज आपल्या खासदारकीचा राजीनामा  देणार असल्याची चर्चा  होती. अखेर नाना पटोले यांनी त्यांचा राजीनामा संसदेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्याकडे सोपवला आहे. गेले अनेक दिवस नाना पटोले भाजपच्या अनेक धोरणांवर टीका करत आहेत. त्यावरून त्यांच्यावर भरपूर टीकाही होत होती.

नाना पटोले त्यांचा राजीनामा संसदेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्याकडे सोपवला आहे. सरकारच्या कृषी धोरणावरून त्यांनी हा राजीनामा दिला आहे.  गेले अनेक दिवस नाना पटोले भाजपच्या अनेक धोरणांवर टीका करत आहेत. त्यावरून त्यांच्यावर भरपूर टीकाही होत होती. काही दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी राहुल गांधी यांची  भेटही घेतली होती.  तसंच भाजपच्या जीएसटी  आणि नोटाबंदीवर टीका करणाऱ्या यशवंत सिन्हा यांच्या अकोल्यात चालू असलेल्या आंदोलनालाही त्यांचा पाठिंबा होता. त्यामुळे ते लवकरच राजीनामा देणार अशी चर्चा होती. भाजपच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यावर नाना पटोले पुढे काय करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ते काँग्रेस पक्षात सामील होतात .की वेगळी चूल मांडतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments