Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रअनिकेत कोथळेचे मृतदेह तब्बल दोन महिन्यानंतर मिळणार!

अनिकेत कोथळेचे मृतदेह तब्बल दोन महिन्यानंतर मिळणार!

सांगली – अनिकेत कोथळे याचा पोलीस कोठडीत झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला होता. ही घटना उघड झाल्यानंतर त्याचा मृतदेह डीएनए तपासणीसाठी सीआयडीच्या ताब्यात होता. मात्र, तब्बल दोन महिन्यांनी सीआयडीकडून त्याचा मृतदेह आज त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. या प्रकरणी तब्बल पोलिस उपनरीक्षकासह इतर सहा पोलिस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

७ नोव्हेंबर २०१७ रोजी सांगलीच्या पोलीस कोठडीत अनिकेत कोथळे याचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. यानंतर तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे आणि त्याच्या पोलीस साथीदारांनी अनिकेतचा मृतदेह सिंधुदुर्ग येथील आंबोली घाटात जाळून टाकला होता. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचे जोरदार पडसाद राज्यभर उमटले होते. तर, जाळण्यात आलेला अर्धवट मृतदेह डीएनएच्या वैद्यकीय कारणास्तव सीआयडीच्या ताब्यात होता. डीएनए चाचणी पूर्ण झाल्यावर मृतदेह देण्याची ग्वाही सीआयडीने दिली होती. त्यानुसार अनिकेतचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाणार आहे. आज अनिकेतचे कुटुंबीय सीआयडी ऑफिसमध्ये जाऊन मृतदेह ताब्यात घेणार आहेत, अशी माहिती सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर विधिवत सर्व प्रक्रिया करुन मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments