Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रअर्जुन खोतकरांच्या आमदारकीचा आज सर्वोच्च न्यायालयात फैसला

अर्जुन खोतकरांच्या आमदारकीचा आज सर्वोच्च न्यायालयात फैसला

महत्वाचे…
१.खोतकर हे राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास राज्यमंत्रीपदी कार्यरत होते २.विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीवेळी अर्जुन खोतकर यांनी उमेदवारी अर्ज निर्धारित वेळेपेक्षा उशिरा भरल्याचा आरोप झाला होता ३. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष


मुंबई: विधानसभा २०१४ च्या निवडणुकीवेळी अर्जुन खोतकर यांनी उमेदवारी अर्ज निर्धारित वेळेपेक्षा उशिरा भरल्याचा आरोप सिध्द झाला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती पी.व्ही.नलावडे यांनी अर्जुन खोतकरांची आमदारकी रद्द केली होती. त्यानंतर त्यांच्या  आमदारकीवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे.

शिवसेनेचे नेते आणि राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या आमदारकीसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीवेळी अर्जुन खोतकर यांनी उमेदवारी अर्ज निर्धारित वेळेपेक्षा उशिरा भरल्याचा आरोप झाला होता. तसा आरोप  करून  काँग्रेसचे नेते आणि तत्कालीन उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी त्यांच्याविरूद्ध याचिका दाखल केली होती.

यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती पी.व्ही.नलावडे यांनी अर्जुन खोतकरांची आमदारकी रद्द केली होती. तांत्रिक मुद्द्यावर न्यायालयाने आमदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. खोतकरांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. त्यावर आज सुनावणी होणार आहे. त्यांची आमदारकी टिकते की रद्द होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments