Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रआज जाणता राजा शरद पवार यांचा वाढदिवस!

आज जाणता राजा शरद पवार यांचा वाढदिवस!

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार आज ७७ वर्षांचे झाले आहेत. जाणता राजा म्हणून राजकीय जीवनात वेगळा ठसा उमटवलेल्या शरद पवारांची वेगळी छबी आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. जाणता राजाबद्दल थोडक्यात

शरद पवार वयाच्या ७७ व्या वर्षी देखील राजकारणात प्रचंड सक्रीय आहेत. त्यांचा काम करण्याचा उत्साह आजही अनेक तरुणांना लाजवेल असाच आहे. त्यांची ५० वर्षांची राजकीय कारकीर्द आहेत. देशाच्या राजकारणावर छाप पाडणाऱ्या मोजक्या नेत्यांपैकी शरद पवारांची गणना केली जाते. शेती, क्रीडा, साहित्य, विज्ञान अशा सर्वंच क्षेत्रात पवारांनी आपला ठसा उमटवला आहे. राजकारण, समाजकारणात रमणारे पवार हे क्रिकेटमध्येही तितकेच रमतात हे आजवर अनेकदा पाहायला मिळालं आहे. आपल्या ५० वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी अनेक चढ-उतारही पाहिले. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधानपरिषद या संसद आणि विधिमंडळाच्या सर्व सभागृहांचे प्रतिनिधीत्व करण्याचा मानही पवार यांना मिळाला आहे. १९६७ पासून आतापर्यंत सातत्याने पवार निवडून आले आहेत. १९८४ मध्ये पवार पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर ते पुन्हा १९८५ साली राज्याच्या राजकारणात परतले होते. १९९१ मध्ये नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करण्याता आला होता. १९९३ मध्ये राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यावर त्यांनी विधानपरिषदेवर निवडून जाण्याचा पर्याय स्वीकारला. १९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर येथील परिस्थिती हातळण्यासाठी शरद पवारांकडे राज्याचं नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची ही त्यांची चौथी वेळ होती. पण १९९५ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात युती सरकार निवडून आलं. १९९६ साली पवार लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर पवारांनी सोनिया गांधींवर बरीच टीका केली. यावेळी पवारांनी काँग्रेसशी फारकत घेऊन १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. कालांतराने राष्ट्रवादीनं काँग्रेसशी आघाडी केली.
२००४ साली पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या मंत्रिमंडळात शरद पवारांनी कृषी मंत्री म्हणून सूत्रं हाती घेतली. त्यानंतर २००९ साली पुन्हा मनमोहन सिंह यांचं सरकार सत्तेत आलं आणि पुन्हा एकदा पवारांवर कृषी मंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. दरम्यान, २०१० साली पवारांची आयसीसीच्या अध्यक्षपदीही निवड झाली होती. सध्या पवार राज्यसभेचे सदस्य आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments