Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रइतरांनी केली तर खुद्दारी पण आम्ही केल्यावर गद्दारी- उद्धव ठाकरे

इतरांनी केली तर खुद्दारी पण आम्ही केल्यावर गद्दारी- उद्धव ठाकरे

मुंबई: घोडेबाजारी केल्याचा आरोप गाढवांनी करु नये. आमचं बळ वाढल्याने त्यांच्या पोटात मुरडा येत असेल, तर ते मित्रपक्ष कसले? आम्हाला मित्रपक्ष मानत असतील, तर भाजपानं आमच्या आनंदात सहभागी झालं पाहिजे. भाजपला पोटदुखी कशाला,कोणाला फटका द्यायचा म्हणून त्या सहा नगरसेवकांना शिवसेनेत घेतलं नाही, त्यांनीच सेनाप्रवेशाची इच्छा व्यक्त केली होती. इतर राज्यात भाजपाने काय केले त्यांनी केली तर खुद्दारी आणि आम्ही केली तर गद्दारी, इतर राज्यात भाजपाने काय केले. असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकारी परिषदेत केला.

मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मातोश्रीवर शुक्रवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेण्यात आली. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन सहा जुने सहकारी पुन्हा शिवसेनेत यावेळी ठाकरे म्हणाले की,सहा जण स्वगृही परतले आहेत. त्यांनी स्वत: शिवसेनेत येण्याची इच्छा व्यक्त केली होती. एका दिवसात सेना इतकी जमवाजमव करत असेल, तर ताकदीचा अंदाज आलाच असेल असाही टोला लगावला.

भांडुप पोटनिवडणुकीनंतर हालचाली
काल (गुरुवार) भांडुप पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या पराभवानंतर भाजप बरीच आक्रमक झाली होती. ‘लवकरच मुंबईत आमचा महापौर बसवू.’ असं वक्तव्य भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केले होतं. भाजपच्या संभाव्य खेळी लक्षात घेऊन शिवसेनेनं  एक भन्नाट चाल खेळत मनसेच्या तब्बल ६ नगरसेवकांना फोडलं. या सर्व घडामोडीत शिवसेनेचे आमदार अनिल परब आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.पोटनिवडणुकीतील पराभवानंतर शिवसेनेनं तात्काळ परिस्थितीचा आढावा घेतला आणि काल रात्रीच सर्व चर्चांना सुरुवात झाली. शिवसेनेनं ही खेळी एवढ्या शांतपणे खेळली की, मनसे आणि भाजपला याचा थांगपत्ताही लागला नाही.

भाजप बॅकफुटवर
शिवसेनेच्या या खेळीनं भाजप सध्या बॅकफूटवर गेलं आहे. तर मनसे अजूनही या धक्क्यातून सावरलेलं नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

मुंबई महापालिकेतील मनसेचे नगरसेवक
अर्चना भालेराव – वॉर्ड 126
परमेश्वर कदम – वॉर्ड 133
अश्विनी मतेकर- वॉर्ड 156
दिलीप लांडे – वॉर्ड 163
संजय तुर्डे – वॉर्ड 166
हर्षल मोरे – वॉर्ड 189
दत्ताराम नरवणकर- वॉर्ड 197
वॉर्ड क्र. 166चे संजय तुर्डे सोडता सहाही नगरसेवक हे शिवसेनेसोबत गेले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments